सारांश
आधुनिक युगात लोकपरंपरा दर्शविणारया बहुतांश प्रकारांच्या पुनरूज्जीवन, जतन आणि संवर्धनाचे प्रयत्न फार मोठया प्र्रमाणावर होताना दिसत आहेत. याचे महत्वाचे कारण म्हणजे सांस्कृतिक वारसा ठरलेले हे विविध प्रकार आधुनिक काळात नामशेष होत आहेत अशी भिती निर्माण होत आहे. केवळ मौखिक परंपरेने विकसित झालेल्या कीर्तनासारख्या कलाप्रकारंची आवड नवीन पीढीत निर्माण करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब आज केलेला दिसतो. यातील एक प्रमुख मार्ग म्हणजे या कलांच्या प्रशिक्षणाविषयीची जागरूकता. कीर्तन परंपरेतही आज विविध संस्थाद्वारे कीर्तनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रस्तुत लेखात आधुनिक युगात कीर्तनाचा प्रचार प्रसार आणि प्रशिक्षण पध्दती याविषयीचा विचार केला आहे.
विषयप्रवेश
कीर्तन भारतीय लोकसंस्कृतिचे महत्वपूर्ण अंग आहे. भारताच्या प्रत्येक प्रांतातच कीर्तन हा भक्तिमार्गातील ईश्वरप्राप्तीचा सहज आणि सोपा मार्ग मानला गेला आहे. कोणत्याही जटिल नियमांचे बंधन नसलेला, भक्त आणि ईश्वराला सहजपणे जोडणारा कीर्तन हा एक दुवा आहे. कीर्तन कोणी करावे याला जसे बंधन नाही, तसेच ते कुठे करावे आणि कोणत्या विषयावर करावे यालाही फारसे बंधन आढळून येत नाही. मात्र ईश्वरभक्तीचे साधन असल्याकारणाने त्यातील शुचिता आणि पावित्र्य राखले जावे हीच काय ती अपेक्षा असते. कीर्तनाची मूळ बैठक जरी पारमार्थिक असली तरी समाजप्रबोधन, मनोरंजन आणि संस्कृतिरक्षण हे कीर्तनाचे अतिरिक्त उट्ठेश्श आहेतच. अनुकूल आणि संयमित जीवन व्यतीत करण्यासाठी कीर्तन नेहमीच प्रेरणादायी ठरते. श्रेष्ठ समाजनिर्मितीच्या आधारशीलेसाठी ज्या जीवन मूल्यांची आवश्यकता असते ती जीवनमूल्ये कीर्तनातून प्राप्त होतात‐ मानवी मनाला आणि समाजाला एकत्रित ठेवण्यासाठी कीर्तनासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची निश्चितच मदत होते. मात्र आधुनिक युगातील माहिती आणि तंत्रज्ञानाच्या अति विकासामुळे पश्चिमी विचारांचे वारे आपल्याही देशात वाहू लागले आहेत आणि आजची नवी पीढी ही या पारंपारिक सांस्कृतिक ठेव्यांपासून दूर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढे काही काळाने आयुर्वेद, योग, भारतीय संगीत इ. भारतीय परंपरेचे द्योतक असणारया कला आणि विद्यांप्रमाणेच कीर्तनाचे ही महत्व टिकवून ठेवायचे असेल तर त्याचे शास्त्रशुध्द स्वरूप टिकविण्यासाठी संरक्षण आणि संवर्धनाचे प्रयत्न होणे आवश्यक आहे.
परिवर्तन एक सहज प्रक्रिया आहे. सामाजिक परिवर्तनांबरोबरच लोकसंस्कृतीत परिवर्तन होणे अभिप्रेतच आहे. संस्कृतिमध्ये होणारया परिवर्तनाबरोबरच भाषा, राहणीमान, खान पान, जीवन संघर्ष या सर्वांतच परिवर्तन होत असते. या होणारया बदलांना सामारे जाणे हे कोणत्याही संस्कृतिच्या विकासासाठी क्रमप्राप्तच असते, फक्त ते बदल परंपरेच्या अंतर्गत मर्यादित स्वरूपातील असावे, नाहीतर समाजापुढे एक नवीन सांस्कृतिक संकट उभे राहील. त्यामुळे हे बदल समाज सापेक्ष असावेत. नवीन सकारात्मक तत्वांच्या विकासाबरोबर ही परंपरा अधिक दृढ होईल, कोणत्याही संस्कृतिचा ऐतिहासिक आढावा घेतल्यास एक बाब ध्यानात येते की विशिष्ट कालावधीनंतर समाजमान्यता बदलतात. हीच बाब कीर्तन पध्इतीला पण लागू आहे. महाराष्ट्रीय परंपरेचे अविभाज्य अंग असलेला कीर्तन हा लोकसंस्कृतिचा भक्तिपूर्ण कलाप्रकार पूर्वी जरी महाराष्ट्रातील कानांकोपरयांत प्रचलित असला, तरी आज हा कलाप्रकार कालाबरोबर लुप्त होईल की काय अशी शंका निर्माण झाली आहे‐ आणि असे झाल्यास त्याचे पुनरूज्जीवन केवळ अशक्य होईल. यासाठी आज काही ठेास पावले उचलण्याची आवश्यकता आहे‐ गावागावांतून विकसित होऊन आज महानगरांमधील विविध मंचांवर सादर होणारया या कलेला पुनर्जिवीत करण्यासाठी शिक्षणसंस्थंसारखे दुसरे माध्यम नाही. आजच्या काळातील युवा पीढीचा कल कोणतीही कला केवळ रूचि म्हणून शिकण्यापेक्षा त्यात पदवी प्राप्त करून तिला उपजीविकेचे साधन बनविण्यामागे अधिक आहे. आणि त्यामुळे शिक्षण संस्थांमध्ये कीर्तनसंबंधी प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम सुरू केल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकेल. यासंबंधी महाराष्ट्रातील काही विद्यापीठांनी पुढाकार घेऊन प्राथमिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यास सुरूवातही केली आहे. त्याच आधारावर पुढे संशोधनाच्या शक्यताही या क्षेत्रात निर्माण होतील आणि परंपरेचे जतन आणि संवर्धन ही होईल. आज महाराष्ट्रात जरी काही संस्था आणि विद्यापीठे यासाठी प्रयत्नरत असल्या तरी हे प्रयत्न व्यापक स्वरूपात होणे आवश्यक आहे‐ यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांमधून कीर्तनात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणे, शासनद्वारे होतकरू विद्याथ्र्यांना शिष्यावृत्ती आणि अध्येतावृत्ती उपलब्ध करून देणे आदि प्रयत्न या दिशेने होणे आवश्यक आहे.
आज महाराष्ट्रात कीर्तनाचे विधिवत प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत असलेल्या काही संस्था आणि त्यांची विस्तृत माहिती पुढीलप्रमाणे:-
1) वैदर्भिय हरिकीर्तन संस्थेचे कीर्तन महाविद्यालय:-
नव्या पीढीमध्ये कीर्तनाची आवड निर्माण व्हावी, त्या दृष्टीने या भक्तिरूप कलेचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण मिळावे, कीर्तनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, त्याचबरोबर या क्षेत्रातील नवनीवन प्रतिभेचा शोध घेण्याच्या उद्दश्शाने या संस्थेची स्थापना 1 आगस्ट 2001 रोजी झाली. हे महाविद्यालय कवी कुलगुरू कालीदास विश्वविद्यालय रामटेक शी संलग्न असून कीर्तनाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देऊन त्याची विधिवत परिक्षा घेऊन पदवी प्रदान करणारे महाराष्ट्रातील प्रथम कीर्तन महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाचे संचालन वैदर्भिय हरिकीर्तन संस्थेद्वारे केले जाते. कीर्तन विषयात एक एक वर्षांच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ पदविका, तीन वर्षीय पदवी आणि द्विवर्षीय पदव्युत्तर असे या अभ्यासक्रमाचे स्वरूप असून या पदव्या संपूर्ण भारतभर मान्य आहेत. इतर विद्यापीठांप्रमाणेच पदवी परिक्षेसाठी किमान पात्रता 12वी उत्तीर्ण आणि 18 वर्षे पूर्ण असून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी बी.ए. कीर्तनशास्त्र उत्तीर्ण ही पात्रता मान्य केली गेली आहे. हे महाविद्यालय विना अनुदानित तत्तवावर चालविले जाते. आजपर्यंत हजारेा विद्याथ्र्यांनी या प्रशिक्षण वर्गांचा लाभ घेतला आहे. या अभ्यासक्रमांमध्ये संस्कृत मराठी साहित्य, भारतीय तत्वज्ञान, आणि नीतीशास्त्र, भारतीय संगीत आणि कीर्तनी संगीत, कीर्तन प्रयोग आदि विषय शिकविले जातात. सर्वच वर्षांना हे पाचही पेपर्स अनिवार्य असले तरी त्यामध्ये समाविष्ट केलेल्या उपविषयांची क्लिष्टता कोर्सच्या स्तराबरोबर वाढत जाते‐ सध्या प्रसिध्द नारदीय कीर्तनकार डाॅ. दिलीप डबीर या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम बघत आहेत. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी सहा ते नऊ या कालावधीत होतात. शास्त्र आणि प्रात्यक्षिक या दाहोंचा मेळ या अभ्यासक्रमांत घातलेला दिसतो. प्रात्यक्षिक परिक्षेच्या वेळी विद्याथ्र्यांना कीर्तनाची पारंपारिक वेषभूषा परिधान करणे अनिवार्य असते.
रसिकांचा उत्तम प्रतिसाद आणि कीर्तन महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन विविध कीर्तन महोत्सव, बाल आणि युवा कीर्तनकारांचे प्रादेशिक संमेलन, कीर्तनासाठी विविध पुरस्कारंचे आयोजन, संकल्पना आधारित कीर्तन महोत्सव इ. अनेक उपक्रमांच्या माध्यमातून वैदर्भिय हरिकीर्तन संस्था कीर्तनाचा प्रचार आणि प्रसार करीत आहे.
2) अखिल भारतीय कीर्तन संस्था, दादर पश्चिम, मंुबई
नारदीय कीर्तनाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देऊन नवीन कीर्तनकार तयार करण्यासाठी 1940 साली या संस्थेची स्थापना झाली. तोपर्यंत मुंबईमध्ये कीर्तन हा विषय पाठशाळांच्या माध्यमातून शिकविणारया संस्था नसल्यामुळे अशाप्रकारे कीर्तनाचे प्रशिक्षण देणारी ही पहिली कीर्तनशाळा ठरली. या संस्थेचे स्वतःचे विठ्ठल रखुमाई मंदिर असल्याकारणाने दररोजच संस्थेत कीर्तनाचे कार्यक्रम होतात आणि या कार्यक्रमांसाठी श्रोत्यांची उपस्थिती देखील चंागली असते. सुरूवातील पाच वर्षांचा असलेला हा अभ्यासक्रम 2000 मध्ये तीन वर्षांचा केला गेेला. या अभ्यासक्रमासाठी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी देखील कीर्तन शिकण्यासाठी येतात. आजच्या तांत्रिक प्रगतीच्या युगात दर वर्षी 30 ते 35 विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. विद्याथ्र्यांना कीर्तनासाठी उपयुक्त साहित्याची निर्मिती ही संस्थेद्वारा केली गेली असून विद्याथ्र्यांना माफक किमतील हे साहित्य उपलब्ध करून दिले जाते. 2007 मध्ये विविध अडचणींमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रशिक्षण घेण्यास असमर्थ असलेल्यांसाठी पत्रव्यवहाराने कीर्तन शिकविण्यासाठी एक दूरस्थ अभ्यासक्रम आणि त्याची परिक्षापध्दती ही निर्माण करण्यात आली. आजपर्यंत सुमारे 400 हून अधिक विद्यार्थी या संस्थेेतून अभ्यासक्रम पूर्ण करून कीर्तनावर आपली उपजीविका यशस्वीरित्या करीत आहेत. कीर्तनाबरोबरच या संस्थेत कीर्तनाला आवश्यक असे संगीत वर्ग, भजन आणि सुगम संगीत वर्गही घेतले जातात. या अभ्यासक्रमांचे मुंबई हे मुख्य केंद्र असून धुळे, औरंगाबाद, चिपळूण, पनवेल, डोंबिवली, बीड, वाशीम, गोवा इ‐ ठिकाणी उपकेंद्रेही आहेत.
संस्थेतील पदविका प्राप्त विद्यार्थी तसेच तत्सम पदवी पा्राप्त बाहय विद्याथ्र्यांसाठी प्रगत कीर्तनकार हा दोन वर्षांचा विशेष अभ्यासक्रम ही संस्थेद्वारे चालविला जातो. वर्षभर संस्थेत चालणारया विविध उपक्रमांमध्ये दैनंदिन कार्यक्रम, विशेष कार्यक्रम, नैमित्तिक उपक्रम आणि अतिरिक्त उपक्रम या अंतर्गत कीर्तनाच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. संस्थेद्वारे महाराष्ट्रातील कीर्तनकारांची एक सूचि निर्माण करण्यात आली आहे जेणेकरून इच्छुक आयोजक या कीर्तनकारांशी संपर्क साधून त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करू शकतील.
3) भारती विद्यापीठ, अभिमत विश्वविद्यालय, पुणे
भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास विभागाने अ दर्जाचे विद्यापीठ म्हणून मान्य केलेल्या या विद्यापीठात स्कूल आॅफ परफाॅर्मिंग आटर््स च्या अंतर्गत नारदीय आणि वारकरी कीर्तन या दोनही पध्दतीत कीर्तन पदविका अभ्यासक्रम नुकतेच सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांना पदवी समकक्षता प्राप्त झालेली असून पुढील वर्षी पदवीच्या तृतीय वर्षाचा अभ्यासक्रम याअंतर्गत सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठीय स्तरावर कीर्तनासारख्या पारंपारिक आणि संास्कृतिक वारसा जपणारया विषयात पदवी आणि त्यापुढे पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविणारे हे महाराष्ट्रातील कवि कुलगुरू कालिदास विद्यापीठ रामटेक नंतरचे दुसरे विद्यापीठ होय. या अभ्यासक्रमात वारकरी कीर्तनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ह.भ.प. श्री निंबराज महाराज जाधव आणि नारदीय कीर्तनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. चारूदत्त आफळे कार्यरत आहेत. येथे गुरूकुल पध्दतीने कीर्तनाचे प्रशिक्षण दिले जाते‐ सध्या या अभ्यासक्रमासाठी एकूण 75 विद्याथ्र्यांनी. प्रवेश घेतला असून या क्षेत्रात करियर करण्यास उत्सुक असणारया विद्याथ्र्यांची संख्या वाढत आहे असा येथील शिक्षकांचा अनुभव आहे.
4) वारकरी शिक्षण संस्था, श्रीक्षेत्र आळंदी
या संस्थेची सुरूवात श्राीक्षेत्र आळंदी येथे 1917 मध्ये झाली. सर्वसामान्य लोकांच्या पारमार्थिक हितासाठी सद्गुरू जोग महाराज यांनी या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या अन्य उद्देश्शांबरोबरच संप्रदायाची कीर्तन आणि भजन परंपरा वाढविणे, त्याचे विधिवत प्रशिक्षण देऊन आचारबध्द कीर्तनकार, प्रवचनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक तयार करणे हा देखील या संस्थेच्या स्थापनेमागील एक उद्देश्श होता. या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले शेकडो प्रवचनकार आणि कीर्तनकार आज महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. या संस्थेचे प्राचार्य म्हणून बंकट स्वामी महाराज, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, मामासाहेब दंाडेकर आदि गुणीजनांनी भागवदधर्माचा प्रचार प्रसार केला. या संस्थेद्वारे चार वर्षांचा अभ्यासक्रम राबविला जातो, ज्यामध्ये प्रवेश परिक्षेत उत्तीर्ण झाल्यावरच प्रवेश दिला जातो. असे असले तरी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कोणतीही पदवी अथवा प्रमाणपत्र प्रदान केल्या जात नाही’. चारही वर्षांच्रूा परिक्षा हया प्रत्येक वर्षाच्या शेवटी लेखी स्वरूपात घेतल्या जातात. कीर्तन आणि प्रवचनाची प्रात्यक्षिक सादरीकरण परिक्षा देखील घेतली जाते. या चार वर्षांच्या काळात व्याकरण, अभंग, गीता, विविध पदे, ज्ञानेश्वरी आणि पंचदश या ग्रंथांचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून दिल्या जाते. हा संपूर्ण अभ्यासक्रम निःशुल्क आहे.
याचबराबर हरीकीर्तनोत्तेजक सभा सदाशिवपेठ पुणे येथील नारद मंदिर आणि सांगली येथील अखिल भारतीय कीर्तनकुल या आणि अशाप्रकारच्या अनेक संस्था आधुनिक काळात कीर्तनाच्या प्रचार प्रसाराचे कार्य करीत आहेत.
अभ्यासक्रम
कीर्तनाच्या प्रशिक्षणाअंतर्गत आवश्यक गोष्टींचा सखोल अभ्यास केल्यानंतरच अभ्यासमंडळातील तज्ञंानी वरील सर्वच शिक्षण संस्थांमधील पाठयक्रम निर्माण केले आहेत. अभ्यासक्रमाची रचना करताना पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची गहनता आणि काठिण्य टप्याटप्याने वाढविलेले दिसते. सैध्दांतिक, रंगमंच आणि मौखिक या तीन भागांमध्ये दरवर्षी दोन सत्रांमध्ये विविध विषयांचे विभाजन केलेले असून त्यानुसार विद्याथ्र्यांची परिक्षा घेतली जाते‐ विद्याथ्र्याला केवळ कीर्तनाचेच नाही तर अन्य संबंधित विषयाचेही मार्गदर्शन मिळावे याचा पूर्ण विचार या अभ्यासक्रमांत केेलेला दिसतो. यात संस्कृत आणि मराठी साहित्य, भारतीय तत्वज्ञान, नीतीशास्त्र, भारतीय संगीत, कीर्तनी संगीत, कीर्तन प्रयोग, कीर्तनांचे विविध प्रकार, संतपरंपरा, अभंग आणिा सुभाषितांचा अभ्यास आदींचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर भारतात अस्तित्वात असणारया इतर कीर्तनपरंपरांचा आढावाही या अभ्यासक्रमंात घेतला गेला आहे‐ अशाप्रकारे विषयाचा सर्वंकष अभ्यास विद्याथ्र्यांना व्हावा या हेतूने हे अभ्यासक्रम रचले गेले आहेत.
अभ्यासक्रमांत समाविष्ट विषयांबरोबरच विद्याथ्र्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील कार्यक्रम ही राबविणे शक्य झाल्यास या विद्यापीठांमधून अथवा संस्थांमधून बाहेर पडणारा विद्यार्थी हा एक परिपूर्ण विद्यार्थी होऊन याच क्षेत्रात उपजीविका प्राप्त करण्यास सक्षम होईल.
संगणक हाताळणी: आज वेगाने विकासित होणारे तंत्रज्ञान आत्मसात करणे हे प्रत्येक विद्याथ्र्याला क्रमप्राप्त आहे कारण आपले काम संपूर्ण जगासमोर मांडण्याची उत्तम संधी विद्याथ्र्यांना या तंत्रज्ञानाद्वारे निर्माण झाली आहे‐ विषय कोणताही असला, तरी त्याला वैश्विक स्तरावर मांडण्यासाठी संगणकासारखे दुसरे माध्यम नाही. आणि म्हणूनच सर्वच विद्यापीठांमधील विद्याथ्र्यांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक केले गेले आहे. संगणकाच्या माध्यमातून माहितीच्या महाजालाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीचा उपयोग विद्यार्थी आपल्या अभ्यासासाठी करू शकतात आणि अशाप्रकारे वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत देखील होते. संशोधनामध्ये तर संगणकाचे अत्यंत महत्व आहे आणि आधुनिक युगात संशोधनासाठी संगणक हे वरदान ठरले आहे. म्हणूनच अगदी पदविका स्तरापासूनच विद्याथ्र्यांना संगणक हाताळण्याचे प्रशिक्षण प्राप्त झाले, तर ते विद्याथ्र्यांच्या विकासाच्या दृष्टीने फायदेकारकच राहील.
स्ेमिनार: कीर्तनाशी संबंधित विविध विषयांवर परिसंवाद आणि कार्यशाळांचे आयोजन करून एकाच मंचावर अनेक विषयतज्ञांना पाचारण करता येते आणि एखादा विशिष्ट विषय निवडून त्याच्या विविध पैलूंवर चर्चा करून त्यासंबंधी अधिक माहिती प्राप्त करता येते. याचा फायदा असा होेतेा की असे वक्ते ज्यांना सामान्य विद्यार्थी भेटूही शकत नाहीत, त्यांच्याकडून विद्याथ्र्यांना मार्गदर्शन प्राप्त होते.
मंच प्र्रदर्शन: कोणत्याही प्रदर्शन कलेची पूर्तता तिच्या प्रस्तुतीकरणाशिवाय होवूच शकत नाही. कीर्तन ही देखील एक प्रस्तुतीकरण केंद्रित कला असल्यामुळे प्रशिक्षणाच्या कालावधीत विद्याथ्र्यांना मंच प्रदर्शनाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून दिल्यास त्यांना मंचप्रदर्शनाची सवय होते आणि आत्मविश्वास वाढतो.
कार्यक्रम:- महाराष्ट्र ही संतांची भूमि आहे. त्यामुळे पूर्वीपासूनच देवी देवतांचे उत्सव आणि समारंभ प्रसंगी गावोगावी कीर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन होत असे. आज बदलत्या सामाजिक परिस्थिती आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कीर्तनाच्या या कार्यक्रमांचे आयोजन कमी झाले आहे आणि त्याची जागा मनोरंजनाच्या आधुनिक प्रकारांनी घेतली आहे. मात्र कीर्तनाची परंपरा जपण्यासाठी गावोगावी तसेच शहरी भागातही इतर कार्यक्रमंाबरोबरच कीर्तनाच्या कार्यक्रमांचेही आयोजन केल्यास नवीन पीढीला आपल्या समृध्द सांस्कृतिक परंपरेची ओळख पटेल, त्यातून कीर्तनाच्या माध्यमातून व्यवसायाच्या संधी निर्माण होतील आणि आधुनिक पीढीतही युवा कीर्तनकार घडू लागतील. अशाप्रकारे कीर्तन महोत्सवांचे आयोजन आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत आहे.
आडियो-व्हिडीयो द्वारे लोकशिक्षा: आधुनिक युगातील तांत्रिक प्रगतीचा उपयोग कीर्तनासारख्या पारंपारिक कलेसाठी करणे आज शक्य आहे‐ त्यासाठी चांगल्या कीर्तनकारांची वेगवेगळया विषयावरील कीर्तने आॅडियो-व्हिडीओ माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहचविता येईल तसेच कीर्तन प्रशिक्षण केंद्रंामध्ये ही विद्याथ्र्यांना ती दाखविली जावीत जेणेकरून चांगले कीर्तन कसे करावे याचे प्रत्यक्ष उदाहरण त्यांच्यासमोर असेल.
शैक्षणिक भ्रमण: शैक्षणिक भ्रमण म्हणजे विशिष्ट विषयासंबंधी विद्याथ्र्यांनी ज्या कलेची किंवा शास्त्राची तात्विक बाजू अभ्यासिली आहे तिचा त्या कार्यक्षेत्रात जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेणे. शैक्षणिक भ्रमणाने विद्याथ्र्याला विशिष्ट स्थळ आणि तेथील विषयासंबंधीच्या घडामोडींविषयीची अधिकृत माहिती प्राप्त होते, जिचा उपयोग त्यांना आपल्या पुढील वाटचालीत निश्चितपणे करता येतो. शैक्षणिक भ्रमण काढण्यामागे विशिष्ट उट्ठेश्श असतो. जे ज्ञान विद्याथ्र्यांना चार भिंतींच्या आत मिळू शकत नाही, ते ज्ञान त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विषयाशी संबंधित जास्तीत जास्त विद्वानांचा विद्याथ्र्यांशी परिचय व्हावा, त्यांच्या अनुभवसिध्द विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि त्यातून एक आदर्श विद्यार्थी घडावा हा शैक्षणिक भ्रमणामागील प्रमुख उट्ठेश होय.
स्पर्धा: आधुनिक युग हे स्पर्धेचे युग आहे. कीर्तनाच्या क्षेत्रातही जर स्पर्धांंचे आयोजन केले, तर कीर्तनाचे प्रशिक्षण घेणारया विद्याथ्र्यांना एक प्रेरणा मिळेल आणि आपले प्रस्तुतीकरण अधिकाधिक चांगले कसे होईल यासाठी ते प्रयत्नशील राहतील. स्पर्धांमध्ये प्राप्त झालेल्या प्राविण्यामुळे त्यांच्यात कीर्तनाकडे अधिक गंभीरपणे बघण्याची दृष्टी निर्माण होईल आणि विषयावर प्रभुत्व मिळविण्याची जिज्ञासा त्यांच्यात निर्माण होईल. त्यांना प्राप्त झालेल्या स्पर्धेतील प्राविण्यामुळे या क्षेत्रात पुढे जाऊन काही कार्य करण्याची त्यांना प्रेरणा मिळेल आणि आपेाआपच कीर्तनाचा प्रचार आणि प्रसार होत राहील.
निष्कर्ष
आज विविध कीर्तन संस्थांमधून दिले जाणारे प्रशिक्षण, वेगवेगळया माध्यमांद्वारे होणारा कीर्तनाचा प्रचार आणि प्रसार पाहून एक गोष्ट ध्यानात येते की एक परिपूर्ण कीर्तनकार घडविण्याचे प्रयत्न या संस्था निश्चितच करीत आहेत. कीर्तनाच्या राजकीय कीर्तन, जुगलबंदी कीर्तन काॅर्पोरेट कीर्तन आदि आधुनिक कीर्तन प्रकारांतून समाजप्रबोधनाचे कार्य पूर्वीसारखेच होत आहे. थेाडयाफार प्रमाणांत यांच्या प्रस्तुतीकरणाच्या स्वरूपात आधुनिकीकरणामुळे बदल झालेला दिसतो, मात्र त्यामुळे कीर्तनाच्या मूळ उट्ठेशाला केाठेही अडसर निर्माण झालेला दिसत नाही. आधुनिक पीढीला कीर्तन परंपरेकडे आकृष्ट करायचे झाल्यास त्यांच्याच भाषेत त्यांना याचे महत्व सांगणे योग्य ठरेल आणि असे झाल्यास कीर्तन परंपरेचे जतन आणि संवर्धन होण्यास नक्कीच मदत होईल.