No Events Found In This Domain

Workspace

Sahapedia-UNESCO Fellowship 2018 Marathi

सहपिडिया-युनेस्को फेलोशिप

अर्जांसाठी आवाहन

अंतिम तारीख : ३० जून, २०१८

तुम्ही हौशी संशोधक, विद्यार्थी किंवा अभ्यासक आहात का? तर मग आपला सांस्कृतिक वारसा आणि भारतातील ज्ञानसंचित पद्धतींचा मागोवा घेण्याची तुमच्यासाठी ही एक संधी आहे.

फेलोशिपची माहिती

हौशी संशोधक, विद्यार्थी आणि अभ्यासकांना आपल्या सांस्कृतिक वारशाशी नाते जोडण्याची संधी देणारा आणि भारतातील ज्ञानसंचिताच्या वेगवेगळ्या परंपरांबद्दल त्यांना असणाऱ्या आकर्षणाचे संवर्धन करण्यासाठी आपला दुसरा फेलोशिप कार्यक्रम जाहीर करताना सहपिडियाला आनंद होत आहे.

युनेस्कोने अमूर्त सांस्कृतिक वारसा सुरक्षित ठेवण्यासाठी बोलावलेल्या २००३मधील विद्वसभेमध्ये (याला यापुढे युनेस्को २००३ विद्वसभा असे म्हटले आहे), “सांस्कृतिक विविधतेचा मूळ पाया आणि शाश्वत विकासाची हमी म्हणून अमूर्त सांस्कृतिक वारशाचे महत्त्व” याचा संदर्भ आहे. सहपिडिया – युनेस्कोच्या या  फेलोशिप्स, याबाबत स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जागृती करण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे - अमूर्त वारशांचे महत्त्व, *परिशिष्ट १ मधील वेगवेगळे समुदाय, गट आणि व्यक्ती यांना ते वापरण्याची संधी देऊ करत आहे.

सहपिडिया - युनेस्को फेलोशिप २०१८ला सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार यांचे साहाय्य आहे.

या उपक्रमाअंतर्गत, फेलोशिप मिळणाऱ्या व्यक्तींना संस्कृतीबद्दलच्या ज्ञानाबद्दलच्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे दस्तावेजीकरण आणि त्याबद्दल महत्त्वाचे संशोधन करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. त्यांच्या निर्मितीला सहाय्य करणाऱ्या संपर्कजाळ्यासोबत त्यांचा संवाद होईल व त्यांच्या संपर्कजाळ्यात वाढही होईल. ही फेलोशिप मिळालेल्या व्यक्तींनी केलेले संशोधन व दस्तावेज सहपिडिया वेबपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येतील व त्यामुळे ऑनलाईन संसाधने अधिक समृद्ध होतील.

भाषा

यावर्षी ही फेलोशिप पुढील भाषांकरता देण्यात येणार आहे - इंग्रजी, हिंदी, उर्दू, बंगाली, मराठी, तमिळ आणि मल्याळम. प्रादेशिक भाषांमध्ये संशोधन आणि दस्तावेजीकरण व्हावे यासाठी आम्ही प्रोत्साहन देऊ.

पात्रता

ही फेलोशिप मानवता आणि समाजशास्त्र अभ्यासशाखांच्या व्यापक व्याख्येनुसार त्यातील उच्चपदवीधर किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेल्या व्यक्तींसाठी आहे, किंवा ज्यांना समकक्ष  अनुभव आहे अशा व्यक्तींसाठी आहे. ज्या अर्जदारांना अर्ज केलेल्या विषयात पूर्वीचा व्यावसायिक किंवा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव असेल, त्यांना अधिक प्राधान्य दिले जाईल. ही फेलोशिप केवळ भारतीय बँकेत खाते असणाऱ्या अर्जदारांसाठीच उपलब्ध आहे. यासंबंधीच्या अधिक माहितीसाठी परिशिष्ट ५मधील ‘नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न’ (FAQ) हा विभाग पाहा.

कालावधी

या फेलोशिपअंतर्गत करायचे काम १५ ऑगस्ट २०१८ ते १५ फेब्रुवारी २०१९ या चोवीस (२४) आठवड्यांच्या कालमर्यादेमध्ये पूर्ण करायचे आहे. निर्धारित कालमर्यादेमध्ये फेलोशिपमधील काम पुरे झाले नाही, तर संबंधित फेलोशिप रद्द केली जाईल. यासाठी अर्जदारांनी परिशिष्ट ३मध्ये दिलेल्या कालरेषेचा संदर्भ यासाठी पाहावा.

प्रकार

या फेलोशिपचे वर्गीकरण संशोधन, दस्तावेजीकरण, किंवा या दोन्हीही प्रकारांचे एकत्रीकरण या प्रकारांत करण्यात आलेले आहे. आपल्या वर्गीकरणाच्या प्रकारानुसार, अर्जदार खाली दिलेल्या यादीनुसार कोणत्या प्रकारात प्रदेय (deliverables) सादर करायचे, हे ठरवू शकतील. यासाठी अर्जदाराने सहपिडियाच्या परिशिष्ट ४मध्ये आशयनिर्मितीसाठी असणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचा संदर्भ पहावा.

प्रदेय (सादर करण्याच्या गोष्टी) (Deliverables)

प्रत्येक फेलोशिपमध्ये एक आवश्यक प्रदेय व तीन पर्यायी प्रदेये असतील. अर्ज करते वेळी अर्जदाराने ही तीन प्रकारची प्रदेये निवडायची आहेत. याखेरीज निवड झालेल्या प्रत्येक अर्जदाराने चौथे प्रदेय सादर करायचे आहे, ज्यामध्ये संदर्भयादी व संबंधित विषयाच्या अधिक वाचनासाठी व संसाधने/ मार्गदर्शके यांची यादी असेल. अर्जदाराला निवडता येणार असलेल्या प्रदेयांसाठी उपलब्ध असलेले पर्याय पुढीलप्रमाणे आहेत.

प्रदेय

सचित्र ओळख / परिचयासाठीचा लेख (३,०००-४,००० शब्द, सोबत ५-१० चित्रे / फोटो), किंवा

छोटा माहितीपट (कालावधी १५-२० मिनिटे, इंग्रजी सबटायटल्ससह, सोबत ५००-८०० शब्दांत सारांश)

प्रदेय २ :

संबंधित लेख (१५००-२००० शब्द, सोबत ३-५ चित्रे) / फोटो), किंवा

फोटो गॅलरी (३०-५० चित्रे किंवा फोटो शीर्षकांसहित), किंवा

फोटो एस्से (छायाचित्रांच्या रूपातील निबंध) (२० प्रतिमा, सोबत चित्रमय सादरीकरणाला पूरक असलेले १,०००-१,५०० शब्द)

प्रदेय ३ :

त्या विषयातील तज्ज्ञ / अभ्यासक / प्रत्यक्ष वापरकर्ता यांची शब्दबद्ध केलेली मुलाखत (१५०० शब्द, यात किमान १० प्रश्नोत्तरे असावीत), किंवा

त्याविषयातील तज्ज्ञ / अभ्यासक / प्रत्यक्ष वापरकर्ता यांसोबतची व्हिडिओ मुलाखत (कालावधी २०-३० मिनिटे).

त्यासोबतच निवडलेल्या अर्जदारांपैकी जे अर्जदार प्रादेशिक भाषांमध्ये काम करत असतील, त्यांनी आपला आशय इंग्रजीमध्ये भाषांतरित करून सादर करायचा आहे.

निधी

निवड झालेल्या अर्जदारांना रु.४०,०००चा पुरस्कार देण्यात येईल व  तो निर्धारित प्रदेयांच्या पूर्ततेनंतर तीन हप्त्यांमध्ये वितरीत केला जाईल. प्रादेशिक भाषांमध्ये काम करणाऱ्या फेलोंना भाषांतरांसाठी जास्तीची रू.१०,०००ची रक्कम मिळेल.

अर्जासाठीच्या मार्गदर्शक सूचना

अर्जासोबतच त्याचा भाग म्हणून पुढील सामग्री सादर करावी :

१. रेझ्युमे किंवा परिचय

२. १,०००-१,५०० शब्दांमधील प्रस्ताव, यामध्ये २००-३०० शब्दांमध्ये त्याचा सारांश असावा.

या प्रस्तावामध्ये कामाची व्याप्ती, कोणत्या प्रकारची प्रदेये आहेत त्यांची निवड, संशोधन पद्धती, कालमर्यादा आणि सध्या त्या विषयासंबंधी अस्तित्वात असणारे साहित्य / कार्य यांबाबतचा परिचय.

३. यासोबत (याआधी अर्जदाराने संशोधनासाठी लिहिलेला) किमान १,५०० शब्दांचा नमुना निबंध.

प्रदेयांच्या निवडीनुसार, अर्जदाराची फिल्म बनवण्याची / व्हिडिओग्राफीची (दस्तावेजीकरणाची), किंवा दोन्ही कौशल्ये दर्शवणारी एक ५-१० मिनिटांची व्हिडिओ क्लिप,

४. कामामागचे प्रयोजन - ५०० शब्दांमध्ये

कामामागचे प्रयोजन (उद्देश) लिहिताना त्यात अर्जदाराच्या कामाच्या सहपिडीयाच्या उद्देश्यांशी असणाऱ्या संबंधाबाबत आणि सहपिडीयाच्या माध्यमातून आशयाचे वितरण करण्याच्या त्यांच्या अनुकूलनाबाबत उल्लेख करणे जरुरीचे आहे. अर्जदाराने आजवर केलेल्या कामांचा अल्प परिचयही  यात समाविष्ट करता येऊ शकेल.

५. विषयासंबंधीच्या संदर्भ ग्रंथांची यादी / उपलब्ध साहित्याची यादी किंवा अन्य सामग्री, यात १५पेक्षा जास्त वस्तूंचा / नावांचा समावेश नसावा.